VIDEO : Rajesh Tope LIVE | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सध्यातरी शक्यता नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

कोरोना लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात 70 टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय. तर 35 टक्के नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोसही देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच टोपे म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सध्यातरी शक्यता नाहीये.

कोरोना लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात 70 टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय. तर 35 टक्के नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोसही देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच टोपे म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सध्यातरी शक्यता नाहीये. राज्यात एकूण साडे नऊ कोटी डोस देण्यात आल्याचं टोपेंनी सांगितलं. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सोयाबीनच्या काढणीचं काम होतं. त्यामुळे मिशन कवचकुंडल अभियानाची गती मंदावली होती. त्यामुळे आता मिशन कवचकुंडल अभियान आता दिवाळीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. ज्या लोकांनी अद्याप कोरोना लस घेतली नाही, त्यांना विनंती आहे की या अभियानाला त्यांनी चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद द्यावा.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI