TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 18 July 2021

मुंबई आणि आसपासच्या परिसरात काल मध्यरात्रीपासून पावसाने दाणादाण उडवली आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.

मुंबईसह वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. मुसळधार पावासामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली आहे. पावासामुळे अने रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते.  परळ, हिंदमाता परिसरात पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत आले आहे. पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने पाण्याचा निचरा होऊ लागला आहे. मात्र अनेक ठिकाणी अजूनही पाणी असल्याने पालिका प्रशासनाची पाण्याचा निचरा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI