Heavy Rain Superfast News | मुसळधार पावसाच्या सुपरफास्ट बातम्या

यवतमाळ : पुसद आणि उमरखेड तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे.  पुसदच्या ब्राम्हणगाव (शामपूर) भागात रात्री आणि आज दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे येथे असलेल्या नाल्याला पूर आला. त्याच नाल्या काठच्या काही घरात पाणी शिरल्याची घटन घडली. जिल्ह्याच्या उमरखेड पुसद रोडवरील दहागाव जवळील नाला ओसंडून वाहत आहे. रात्री उमरखेड तालुक्यातसुद्धा जोरदार पाऊस असल्याने नाल्यांना पूर आला आहे. नाल्यांना पूर असताना नागरिकांनी येथून जाऊ नये असे आवाहन तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी केले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI