Special Report | राज्यभरातील मुसळधार पावसाच्या सुपरफास्ट बातम्या
राज्यात सर्वदूर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही भाग आणि मराठवाड्यात सर्वदूर मुसळधार पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरुच होता. मात्र, सोमवारी रात्री मराठवाड्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन, ऊसाचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेती पिकांसह जमीन खरवडून गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे.
राज्यात सर्वदूर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही भाग आणि मराठवाड्यात सर्वदूर मुसळधार पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरुच होता. मात्र, सोमवारी रात्री मराठवाड्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन, ऊसाचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेती पिकांसह जमीन खरवडून गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे. आधीच पाचवीला पुजलेला दुष्काळ आणि आता अतिवृष्टी यामुळे मराठवाड्यातील शेतकरी पुरता खचला आहे. नदीला पूर आल्यानं अनेक भागात घरात पाणी शिरल्याचं चित्रही पाहायला मिळालं. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे पंचनाम्याचा फक्त सोपस्कार पार न पाडता सरसकट मदत देण्याची मागणी मराठवाड्याती शेतकरी आणि लोकप्रतिनिधी करत आहेत.
नाशिकमध्ये 13 सप्टेंबर रोजी गोदावरीला पहिला पूर आला होता. त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा पूर आला. आता आजही पुन्हा एकदा गंगापूर धरणातून विसर्ग सुरू केल्याने हा वर्षातला तिसरा पूर गोदावरीला आला आहे. सध्या नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे आज मंगळवारी दुपारी बारापासून पुन्हा एकदा धरणातून एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिली आहे.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

