‘काकस्पर्श’, ‘पांघरूण’नंतर वेगळी कलाकृती पडद्यावर, नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?
‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘पांघरूण’ या चित्रपटानंतर महेश वामन मांजरेकर पुन्हा एकदा एक अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. महेश वामन मांजरेकर दिगदर्शित 'ही अनोखी गाठ' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : नात्याच्या रेशीमगाठी, हळुवार फुलणारं प्रेम आणि पती-पत्नीमधील अनोखं नातं उलगडणारी प्रेम कथा पुन्हा एकदा प्रेक्षकांना रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘पांघरूण’ या चित्रपटानंतर महेश वामन मांजरेकर पुन्हा एकदा एक अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. महेश वामन मांजरेकर दिगदर्शित ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केलं आहे. तर या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना दिग्गज कलाकारांची फौज पहायला मिळणार आहे. श्रेयस तळपदेसह गौरी इंगवले, ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील फेमस अभिनेता ऋषी सक्सेना हा प्रियकराच्या भूमिकेत, शरद पोंक्षे हे गौरीचे वडील, सुहास जोशी यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब

