VIDEO: नाशिकमध्ये देशभर गाजलेल्या रसिका-आसिफचं अखेर लग्न

गेल्या 2 महिन्यांपासून चर्चेत असलेला आडगावकर आणि खान परिवारातील लग्नसमारंभ आज अखेर पार पडला. हिंदु व मुस्लिम दोन्ही पध्दतीने हा विवाह लावण्यात आला.

गेल्या 2 महिन्यांपासून चर्चेत असलेला आडगावकर आणि खान परिवारातील लग्नसमारंभ आज अखेर पार पडला. हिंदु व मुस्लिम दोन्ही पध्दतीने हा विवाह लावण्यात आला. अनेक हिंदू संघटनांनी या विवाहाला लव्हजिहादचा रंग देण्याचा प्रयत्न करत विवाह होऊ न देण्याचा इशारा दिला होता. मात्र, धर्मांध संघटनांच्या विरोधाला झुगारून अनेक सामाजिक संघटनांच्या पाठिंब्यासह हा विवाह संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला अंधश्रद्धा निर्मूलन समिती, प्रहार संघटना, राष्ट्र सेवा दल, छात्रभारती अशा सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावत लग्नाला पाठिंबा दिला. | Hindu Muslim interreligious Marriage in Nashik

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI