AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

39 वर्षांचे तौसिफ खान युवक काँग्रेसचे अध्यक्ष कसे? वसीम खान यांचा सवाल

39 वर्षांचे तौसिफ खान युवक काँग्रेसचे अध्यक्ष कसे? वसीम खान यांचा सवाल

| Updated on: Mar 15, 2022 | 11:55 AM
Share

युवक काँग्रेसच्या (youth congress) निवडणूकीत नागपूरातील तौसिफ खान (Tousif Khan) यांची शहरअध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आलीय.

युवक काँग्रेसच्या (youth congress) निवडणूकीत नागपूरातील तौसिफ खान (Tousif Khan) यांची शहरअध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आलीय. पण 39 वर्षांचे तौसिफ खान युवक काँग्रेसचे अध्यक्ष कसे? असा सवाल उपस्थित करत युवक काँग्रेसच्या निवडणूकीत गैरप्रकार झाल्याचा घरचा आहेर दिलाय, शहराध्यक्ष पदाची निवडणूक लढलेले  वसीम खान आणि सहकारी अक्षय घाटोळे (Akshay Ghatole) यांनी. याबाबत दिल्ली दरबारी तक्रार करणार असून, वेळप्रसंगी आंदोलन करु. असा इशाराही त्यांनी दिलाय. युवक काँग्रेसच्या निवडणूकीत सर्वाधिक मत घेणारा अध्यक्ष आणि त्याच्यानंतर मत घेणाऱ्यांना उपाध्यक्ष, महासचिवचे पद मिळते. तौसिफसोबत वसीम खान, रौनक चौधरी, अक्षय घाटोळे यांना मिळालेली मते युवक काँग्रेसने होल्डवर ठेवली होती. रोक हटताच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांच्या गटाने तौसिफ यांना पुन्हा अध्यक्ष निवडण्यात आल्याची घोषणा केलीय. त्यामुळे गटबाजी उफाळून आलीय.