टोरेससारख्या पाँझी स्कीम्सवर कायद्याचा अंकुश कसा नाही? गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होतं?
टोरेस कंपनीचा गैरव्यवहार गंभीर स्वरूपाचा असून त्यात सामान्य नागरिकांची जन्मभराची कमाई पळवून परदेशात नेण्यात आली आहे. ही रक्कम परदेशातील खात्यांमध्ये हस्तांतरीत करण्यात आली असून त्यासाठी बेकायदा मार्गांचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे.
कमी दिवसात जास्तीत जास्त पैशांचा परतावा मिळतो म्हणून सर्वसामान्य लोक आपल्याकडील जमापुंजी विविध स्कीम्समध्ये गुंतवत असतात. अशा योजनांमधून हजारो कोटींचा पैसा जमा केल्यानंतर या कंपन्या आपला गाशा गुंडाळून पोबारा करतात. अशीच एक कंपनी म्हणजे टोरेस ज्वेलर्स कंपनी. लोकांनी आपल्या आयुष्यभराची कमाई या कंपनीत गुंतवली होती. त्यानंतर कंपनीने आपली कार्यालयं बंद केल्याने लोकांचे धाबे दणाणले. अशी टोरेस ही काही पहिली कंपनी नाहीये. आतापर्यंत दोनशेहून अधिक पाँझी स्कीम्स कंपन्या बंद पडल्या आहेत. लोक अशा कंपन्यांमध्ये बिनधास्तपणे गुंतवणूक करतात. मात्र फसवणूक झाल्यानंतर लोकांचे बुडालेले पैसे काही परत मिळत नाहीत. अशा पाँझी स्कीम्सवर कायद्याचा अंकुश कसा नाही, गुंतवणूकदारांचे पैसे पुन्हा मिळतात का, आरोपींवर कारवाई होते का, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात..

शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय

.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक

शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?
