Vinayak Mete : अपघात कसा घडला, विनायक मेटेंच्या चालकाची पोलीस चौकशी करणार

विनायक मेटेंच्या चालकानं सांगितलं की, मी एक तास बसलो होतो रोडवर. मी विचार करतोय माणूस कुणी नाही. एवढं लोकप्रतिनिधी असून माणू कुणी भेटत नाहीय.

गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 14, 2022 | 6:08 PM

मुंबई : विनायक मेटे यांचे अपघातात निधन झालं. अपघात कसा घडला, याची पोलीस चौकशी करताहेत. चालक एकनाथ कदम यांची पोलीस चौकशी करणार आहे. गाडीला भयानक अपघात झाला. गाडीची एक बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. चालकानं दिलेल्या माहितीनुसार, खोपोलीजवळ ट्रकनं कट मारली. त्यामुळं गाडीवरील ताबा सुटला. समोरील अज्ञात वाहनाला अज्ञात वाहनाला धडक बसली. १०० नंबर फोन लावला. परंतु, कुणीही फोन उचलला नाही. मदतीसाठी आम्ही विनवणी केली. पण, कोणतंही वाहन थांबलं नाही. विनायक मेटे बीडहून मुंबईकडं येत होते. यावेळी हा अपघात झाला. अपघाताच्या एका तासानंतर रुग्णवाहिका आली आणि मेटेंना रुग्णालयात नेलं. विनायक मेटेंच्या चालकानं सांगितलं की, मी एक तास बसलो होतो रोडवर. मी विचार करतोय माणूस कुणी नाही. एवढं लोकप्रतिनिधी असून माणूस कुणी भेटत नाहीय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें