AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Crime : नाशिकमध्ये बंद गाळ्यात मानवी अवयव सापडल्याने खळबळ

Nashik Crime : नाशिकमध्ये बंद गाळ्यात मानवी अवयव सापडल्याने खळबळ

| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 10:43 AM
Share

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुंबई नाका येथील एका सोसायटीच्या बंद गाळ्यामध्ये मानवी अवयव सापडले आहेत. वेगवेगळ्या बॉटलमध्ये केमिकल प्रक्रिया करून मानवी डोके, हात, कान असे वेगवेगळे मानवी अवयव ठेवण्यात आले आहेत. तर बादलीमध्ये देखील केमिकल प्रक्रिया करून मानवी अवशेष ठेवले आहेत.

नाशिक : नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्टेशन लगत असलेल्या बिल्डिंगमधील बंद असलेल्या गाळ्यांमध्ये मानवी अवयव (Human Organs) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गाळेधारकाकडे विचारणा केली असता त्याने याबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले. जवळपास पंधरा वर्षापासून गाळे (Gala) बंद असल्याचा गाळा मालकाने दावा केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. मेडिकल शिक्षणासाठी मानवी अवयव संकलन करतात त्याचं पद्धतीने हे अवयव संकलन केलेले दिसले.

Published on: Mar 28, 2022 10:43 AM