भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा राजीनामा, नाराजीचं कारण काय?

विद्यमान खासदार राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे. अशातच अहमदनगरमधील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे राजीनामा देणार असल्याची माहिती मिळतेय.

भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा राजीनामा, नाराजीचं कारण काय?
| Updated on: Apr 16, 2024 | 1:06 PM

अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. विद्यमान खासदार राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे. अशातच अहमदनगरमधील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे राजीनामा देणार असल्याची माहिती मिळतेय. सुजय विखे पाटील यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिल्याने शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे भाजपचे जवळपास १०० कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामूहिकरित्या भाजपचा राजीनामा देणार आहेत. भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर हे शेकडो कार्यकर्त्यांनी सामुहिकरित्या भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, सुजय विखे पाटील यांच्यावर नाराजी दाखवून भाजपचे ओबीसी प्रदेश सदस्य सुनील रासने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात येऊन त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. विद्यमान खासदार यांचा संपर्क आणि कमाची व्याप्ती कमी झाली आहे. साखर वाटप कार्यक्रम असे इव्हेंट त्यांनी केले मात्र फेल ठरले आहे. मी, ४० वर्ष झाले पक्षाचा कार्यकर्ता आहे. राम शिंदे, कर्डिले, मोनिका राजले किंवा विवेक कोल्हे यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे, मी पक्षाचा राजीनामा देत आहे. आमची अहमदनगर दक्षिण ही जागा आली पाहिजे यासाठी मी राजीनामा देत असल्याचे रासने यांनी म्हटले.

Follow us
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.