Maharashtra Rain : राज्यभरात कहर, मुसळधार पावसानं नद्या ओव्हर फ्लो, गावं अन् शेती पाण्याखाली; कुठं काय परिस्थिती?
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला दिसून आलाय. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आल्याचही पाहायला मिळत आहे. राज्यातील कुठे काय परिस्थिती बघा व्हिडीओ
महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसाचा धुमशान सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रत्नागिरी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा आदी जिल्ह्यांतील अनेक लहान मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नांदेडमध्ये पैनगंगा नदीला पूर आला असून, दोन नीलगाय वाहून गेल्या आहेत. हिंगोलीतील इसापूर धरण 100 टक्के भरले असून, त्याचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. बुलढाण्यातील पाचर तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचेही दरवाजे उघडण्यात आले आहेत. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातही नद्यांना पूर आला आहे. अकोला आणि बीड जिल्ह्यातही पावसाने मोठे नुकसान केले आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तर अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

