Weather Forecast : पुण्यात IMD कडून येलो अलर्ट; राज्यात कसे असणार हवामान?
VIDEO | पुणे शहरात ढगाळ वातावरण, हवामान खात्याकडून येलो अलर्ट; राज्यात पुन्हा येणार अवकाळीचे संकट?
पुणे : संपूर्ण राज्यभर अवकाळी पावसाचं सकंट असताना पुणे शहरासह उपनगरात काल रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली आहे. पुण्यातील काही भागात पावसाची संततधार सुरू असून पुणे शहरात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. आज आणि उद्याही पुणे शहरासह उपनगराला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज दिवसभरात पुणे, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतीचं नुकसान झालं असून बळीराजा हवालदिल झाला आहे. तर आता हवामान खात्याने पुणे जिल्ह्यात रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात तीन दिवस अवकाळी पाऊस असणार आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नाशिक शहरात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. आजपासून ९ मे दरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय होणार आहे. यामुळे देशाच्या पूर्व भागासोबत मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातही पावसाची शक्यता आहे. मच्छीमारांना पुढील चार दिवस समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्...
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल

