Maharashtra Weather Update : आठवड्याच्या शेवटी पाऊस झोडपणार? काय सांगतंय हवामान खातं? कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Maharashtra Weather Update : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरपर्यंत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. यासोबत मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने राज्याला चांगलेच झोडपून काढल्याचे पाहायला मिळाले होते. मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या होत्या. तर काही धरणातून विसर्ग देखील सुरू होता. त्यामुळे राज्यातील काही गावात, शहरातील सखोल भागात पाणी शिरलं होतं. दरम्यान, याच पावसाने काहिशी उसंत घेतल्याचे पाहायला मिळाले असताना आता राज्यात मध्य स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्याला हवामान खात्याने मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दिला असून रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे.
Latest Videos
Latest News