कोकण किनारपट्टीवर Monsoon सक्रिय, महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनची एन्ट्री
येत्या 3 जूनला गोव्यात तर 4 जूनला मान्सून कोकणात येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. उद्या अर्थात 2 जूनपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळणार असून सध्या अरबी समुद्र खवळलेला आहे. तर दुसरीकडे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग ही वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
मान्सून संदर्भातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. येत्या 3 जूनला गोव्यात तर 4 जूनला मान्सून कोकणात येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. उद्या अर्थात 2 जूनपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळणार असून सध्या अरबी समुद्र खवळलेला आहे. तर दुसरीकडे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग ही वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टीच्या समुद्राचा रंग देखील बदलला असून समुद्र किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. साधारणतः तळकोकणातून महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होत असते. 4 जूनला मान्सून कोकणात येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत असल्याने महाराष्ट्रातही लवकरच मान्सून येण्याची शक्यता आहे.
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

