Mumbai Weather Update : मुंबईकरांनो काळजी घ्या… आज रात्री मुसळधार पाऊस; IMD कडून मोठी माहिती, कोणता दिला अलर्ट?
हवामान विभागाकडून आज मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत आज रात्री मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईत रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. तर आज सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरू
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. हवामान विभागाकडून आज मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत आज रात्री मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईत रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. तर आज सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरू असताना मुंबई आणि पालघरला हवामान खात्याकडून यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज मुंबईत ४.४ मीटरची हायटाईड जवळपास २ वाजून ४६ मिनिटांनी येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या दरम्यान मच्छिमारांनी मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाणं टाळावं, असं आवाहनदेखील हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

