मुंबईत मध्ये रात्री पावसाच्या हलक्या सरी, उत्तर महाराष्ट्रातही पावसाची हजेरी

मुबईतील दादर , लोअर परेल, महालक्ष्मी आणि आसपासच्या भागात पावसाचा हलक्या सरींमुळे हवामानात गारवा वाढला.  मुंबई, ठाणे पालघरसह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावच्या काही भागाला पावसाने पुन्हा झोडपले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 23, 2022 | 10:57 AM

मुबईतील दादर , लोअर परेल, महालक्ष्मी आणि आसपासच्या भागात पावसाचा हलक्या सरींमुळे हवामानात गारवा वाढला.  मुंबई, ठाणे पालघरसह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावच्या काही भागाला पावसाने पुन्हा झोडपले आहे. मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण , यापुर्वी थंडी काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र आज कोसळलेल्या सरींमुळे हवेत पुनेहा गारवा निर्माण झालाय. येत्या काही दिवसात किमान तापमान 15 अंशापर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.  अचानक आलेल्या पावसामुळे गावच्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बळीराजा संकटात सापडलाय, तर दुसरीकडे मुंबईत या गुलाबी थंडीचा सध्या मुंबईकर आनंद लूटत आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें