“भव्य मोर्चा काढणार नाही, मात्र प्रशासनाला जाब विचारणार”, पाणी प्रश्नावर इम्तियाज जलील आक्रमक

शहरातील विविध भागातील लोकांना भरमसाठ पाणीपट्टी भरूनही आठ ते नऊ दिवसांनी पाणी येते, या मुद्दयावरून शिवसेनेला विरोधकांनी धारेवर धरलं आहे. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 16, 2022 | 3:24 PM

सध्या औरंगाबाद शहरातील (Aurangabad city) पाणी प्रश्न अत्यंत गंभीर असून तो सोडवणं सर्वात महत्त्वाचं आहे. यासाठी विराट मोर्चे काढण्याची आणि नौटंकी करण्याची गरज नाही. एमजेपीच्या अधिकाऱ्यांसोबत बसून प्रश्न सोडवण्याची गरज आहे. मात्र भाजपला हे कळत नाहीये. फडणवीस साहेबांना (Devendra Fadanvis) मी आव्हान देतो, तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरून दाखवा, लोक तुम्हाला हंड्यांनी हाणतील, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिला. शहरातील विविध भागातील लोकांना भरमसाठ पाणीपट्टी भरूनही आठ ते नऊ दिवसांनी पाणी येते, या मुद्दयावरून शिवसेनेला विरोधकांनी धारेवर धरलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें