राज्यात जातीभेदाचं बीज शिवसेनेनं पेरलं – Imtiyaaz Jaleel
गामी निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दर्शवली आहे. त्यावर संजय राऊत यांनी अतिशय तीव्र विरोध दर्शवला. औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय.
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दर्शवली आहे. त्यावर संजय राऊत यांनी अतिशय तीव्र विरोध दर्शवला. औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. त्याला उत्तर देताना खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेला प्रश्न विचारला. तुम्हाला औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे अब्दुल सत्तार चालतात. मग एमआयएम का नकोय? एवढीच हिंमत असेल तर तुम्हाला मुस्लीम मते नकोयत, असे स्पष्ट सांगा, असे आव्हान खासदार जलील (Imtiaz Jaleel) यांनी शिवसेनेला दिले आहे. स्वबळावर लढण्याची तुमची तयारी आहे का? तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन चालयचे आहे, असा टोलाही खासदार जलील यांनी लगावला.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

