येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
राजकारणात अशक्य असे काहीच नाही. अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे भक्कम सरकार राज्यात आहे. त्याचप्रमणे केंद्रातही येत १५ दिवसात बदल झालेला दिसेल असा दावा आमदार रवी राणा यांनी केला.
अमरावती : 28 सप्टेंबर 2023 | अमरावतीच्या छत्री तलावावर आमदार रवी राणा यांच्याकडून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना रवी राणा यांनी एक मोठे विधान केलंय. मी लालबागच्या राजाला गेलो तिथे देशहितासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदिजी यांना साथ दिली पाहिजे असे साकडे घातले. त्यानंतर अनेक ठिकाणी गेलो तिथेही अशीच मागणी केली. अजित पवार यांच्याप्रमाणे शरद पवार हे सुद्धा पंतप्रधान मोदी यांना साथ देतील. येत्या १५ दिवसात हा चमत्कार दिसेल असा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीचे उपमुख्यमंत्री झाले. विरोधी पक्षनेते अजित पवार थेट उपमुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते. राजकारणात काहीही शक्य नाही तसेच अशक्य पण नाही असे ते म्हणाले.
Published on: Sep 28, 2023 08:47 PM
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
