VIDEO : Neeta Patil | नीता पाटील यांच्या घरी आजही आयकर विभागाची छापेमारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहतात. त्याच सोसायटीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही राहतात. त्यांच्या शेजारीच आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे. सकाळपासूनच ही छापेमारी सुरू आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहतात. त्याच सोसायटीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही राहतात. त्यांच्या शेजारीच आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे. सकाळपासूनच ही छापेमारी सुरू आहे. विशेष म्हणजे आयकर विभागाने काल देखील येथे छापेमारी केली होती. नीता पाटील यांच्या घरी आजही आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर साखर कारखान्यावरही धाड मारण्यात आली आहे. आयकर विभागाचे सहा ते सात अधिकारी चार गाड्यातून आले होते. त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवानही होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI