IND vs ENG Test Series : इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ 18 खेळाडूंचा सहभाग, कॅप्टन कोण?
भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघ या इंग्लंड दौऱ्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून भारतीय खेळाडूंची नावं जाहीर झाली आहेत
क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिल हा भारतीय संघाचा कर्णधार तर ऋषभ पंत हा उपकर्णधार असणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली आहे. यासोबत भारतीय संघात करूण नायर याचं देखील पुनरागमन झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर अनफिट असल्याने मोहम्मद शामी भारतीय संघात सहभाग यंदा नसणार आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये कोण-कोण?
- शुबमन गिल (कर्णधार),
- ऋषभ पंत (उपकर्णधार),
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव अशी कसोटी संघाची टीम असणार आहे.