AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Pakistan Conflict : पाकला घेरण्यासाठी नवा डाव... भारत-अफगाणिस्तानची  हातमिळवणी, पहिल्यांदाच तालिबानशी संवाद अन्..

India-Pakistan Conflict : पाकला घेरण्यासाठी नवा डाव… भारत-अफगाणिस्तानची हातमिळवणी, पहिल्यांदाच तालिबानशी संवाद अन्..

| Updated on: May 17, 2025 | 5:42 PM
Share

भारत अफगाण सरकारला शहतूत धरण योजनेसाठी मदत करणार आहे. शहतूत धरण अफगाणिस्तानमधल्या काबुल नदीवर बांधलंय. भारत शहतूत योजनेसाठी २३६ मिलियन डॉलरची मदत अफगाणिस्तानला देणार आहे.

भारताने पहिल्यांदाच अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारसोबत संवाद साधल्याचे समोर आले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली. भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या दरम्यान भारत पहिल्यांदाच तालिबानशी बोललाय. राजकीय स्तरावर आतापर्यंत भारताचा तालिबान सरकारशी संपर्क नव्हता. पण पहिल्यांदाच अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्यावर भारताने राजनैतिक स्तरावर संपर्क केलाय. पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तालिबानने या हल्ल्याची निंदा केली होती. त्यानंतर भारतानेही अफगाणिस्तानच्या या भूमिकेचे स्वागत केलं.

भारताने सिंधू जल करार स्थगित करून पाकिस्तानचं पाणी बंद केलं त्यामुळेच पाकिस्तानमध्ये जलसंकट निर्माण होणार आहे. त्यातच आता अफगाणिस्तानमधून पाकिस्तानात जाणारं पाणीही भारत कुटनीतीने थांबवणार आहे. काबुल नदीवर धरण बांधल्यास या नदीचं पाणी पाकिस्तानमध्ये जाणार नाही. काबुल नदी अफगाणिस्तानातून पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवा प्रांतामध्ये जाते. त्यामुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानमधूनसुद्धा जलकोंडी होणार असून भारताने पाकिस्तानला अफगाणिस्तानातून घेरण्याची तयारी सुरू केली आहे.

Published on: May 17, 2025 05:42 PM