AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shehbaz Sharif : भारतानं शिरून मारलं, रात्री अडीच वाजता मुनीरचा फोन... अखेर शरीफनं केलं मान्य; कबुलनामा काय?

Shehbaz Sharif : भारतानं शिरून मारलं, रात्री अडीच वाजता मुनीरचा फोन… अखेर शरीफनं केलं मान्य; कबुलनामा काय?

| Updated on: May 17, 2025 | 3:05 PM
Share

भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नूर खान एअरबेससह अनेक महत्त्वाची ठिकाणे उद्ध्वस्त झाल्याचे त्याने कबूल केले आहे. शाहबाज शरीफच्या या कबुलीजबाबावरून हे स्पष्ट होते की भारताने योग्य उत्तर दिले आहे. यासोबतच पाकिस्तानचे खोटेपणाही जगासमोर उघड झाले आहे. शाहबाज स्वतः एका जाहीर सभेत याबद्दल बोलत आहेत.

पाकिस्तान आतापर्यंत जे सत्य नाकारत होता. ते सत्य आता पाकिस्तानने मान्य केलं आहे.  भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानने आता कबुलनामा दिलेला आहे. पाकिस्तानात असणाऱ्या नूर खान एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ याच्याकडून मान्य करण्यात आलंय. यासह नूर खान एअरबेसच्या बरोबरीने पाकिस्तानातील अनेक ठिकाणं भारताच्या हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आल्याचे शाहबाज शरीफ याने कबुल केलंय. भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करताना बॅलिस्टिक मिसाईल डागली, असं पाकिस्तान लष्कर प्रमुख असीम मनीरचा मला मध्यरात्री फोन आल्याचे शाहबाज शरीफ याने म्हटलंय तर ९ आणि १० मेच्या सुमारास असीम मुनीरने मला फोन करून माहिती दिली, असं शाहबाज शरीफ याने सांगितलंय.

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईची कबुली आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफने स्वतः दिल्याचे समोर आले आहे. हा तोच पाकिस्तान आहे जो काही दिवसांपूर्वीपर्यंत कोणत्याही पराभवाला नकार देत होता आणि पाकच्या नागरिकांमध्ये बनावट विजय साजरा करत होता. दरम्यान, भारताच्या विजयाची कबुली देताना शाहबाज याने म्हटले की, रात्री असीम मुनीरचा फोन आला आणि नंतर त्याने ऑपरेशन सिंदूर बद्दल सारंकाही  सांगितलं.

Published on: May 17, 2025 03:04 PM