India-Pak War : उद्या देशव्यापी मॉक ड्रिल, Mock Drill म्हणजे काय? आपत्कालीन परिस्थितीत काय करावं? तज्ज्ञांनी सारं सांगितलं…
निवृत्त कर्नल आणि सरंक्षण तज्ज्ञ अभय पटर्वधन यांनी आपत्कालीन स्थितीत काय करावे, काय दक्षता घ्यावी याची माहिती दिली आहे. बघा व्हिडीओ
भारतात 1971 साली मॉक ड्रिल करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल 54 वर्षानंतर भारतात देशव्यापी मॉक ड्रिल केलं जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना सुरक्षा मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये सर्व सरकारी यंत्रणा सहभागी असून विद्यार्थी आणि नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विमानतून हल्ला झाल्यावर नागरिकांनी स्व संरक्षणासाठी करायच्या उपाय योजनांसाठी मॅाक ड्रिल करण्यात येते. सर्व नागरिकांनी मॅाक ड्रिलमध्ये सहभागी होणं बंधनकारक असतं. यावेळी सायरन वाजवला जातो. सायरन वाजला की नागरिकांनी मोकळ्या जागेत धाव घ्यायची. घरात तळमजला, तळघर असेल तर तिथे थांबायचे. यासह संरक्षण भिंत असेल, आडोश्याची जागा असेल पण मोठी इमारत नसेल अशा ठिकाणी लपायचे आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचाय. आपत्कालीन परिस्थितीत काय केलं पाहिजे? तुम्हाला माहितीये… बघा व्हिडीओ…
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

