Indian Airforce : भारत सज्ज…हवाई दलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसांशिवाय आता गुप्त माहिती मिळणार
हवाई दल उच्च-उंचीवरील देखरेखीसाठी हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म सिस्टम (HAPC) विमाने खरेदी करत आहे. ही मानवरहित विमाने वातावरणाच्या उच्च प्रदेशात, स्ट्रॅटोस्फियरमध्ये उडणाऱ्या उपग्रहांसारखी असतात. यामुळे दीर्घ पल्ल्याचे सतत निरीक्षण आणि गुप्तचर माहिती गोळा करणे शक्य होते.
भारतीय हवाई दल आता उच्च-तंत्रज्ञान असलेलं HAPS (High-altitude platform station) खरेदी करणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय हवाई दल एक नवीन घातक शस्त्र खरेदी करण्याची तयारी करत आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून तीन HAPS प्लॅटफॉर्मसाठी RFI (Request for Information) जारी केली आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारी लांब पल्ल्याची विशेषतः मानवरहित हे हवाई वाहनं आहे. १६ ते २० किलोमीटर उंचीवर उडण्याची क्षमता HAPS या हवाई वाहनाची आहे.
भारतीय हवाई दलात असणाऱ्या नियमित विमानं आणि ड्रोनपेक्षा खूप जास्त उंचीवर उडवण्याची क्षमता HAPS या हवाई वाहनात आहे. नियंत्रण रेषा आणि LAC वर सतत देखरेख आणि गुप्तचर माहिती गोळ्या करण्यास HAPS हे वाहन सक्षम असल्याचीही माहिती मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार, हवाई दलाने १८ महिन्याच्या आत उच्च-तंत्रज्ञान असलेलं HAPS खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही विमाने नियंत्रण रेषा आणि चीनच्या सीमेवर शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून हवाई दलाची ताकद अनेक पटींनी वाढवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वैष्णवीचं बाळ इतके दिवस कुठे होतं? बाळाला सांभाळणारं पवळे कुटुंब कोण?

Vaishnavi Hagawane प्रकरणात दादांचं पहिल्यादाच भाष्य, बघा काय म्हणाले

हा हुंडाबळीच, वैष्णवी मला एकच म्हणाली.. मामानं जे सांगितल ते धक्कादायक

मोठी बातमी... हगवणे यांची NCPतून हकालपट्टी, सुनेच्या मृत्यूला कारणीभूत
