Indian Hockey Team | हॉकीमध्ये भारताचा मोठा विजय, 41 वर्षानंतर भारताचा सेमी फायनलमध्ये प्रवेश

भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Men Hockey Team) टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात जागा मिळवली आहे.

मुंबई  : भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Men Hockey Team) टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात जागा मिळवली आहे. कोच ग्राहम रीड आणि कर्णधार मनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वाखाली तब्बल 41 वर्षानंतर भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. यापूर्वी 1980 सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ अखेरच्या वेळेस अंतिम-4 मध्ये जागा बनवू शकला होता. आज झालेल्या क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेन संघाला 3-1 ने नमवत भारतीय संघाने हे यश मिळवलं आहे. आता विश्व चॅम्पियन असणाऱ्या बेल्जियम संघासोबत भारतीय संघ भिडणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI