AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ukraine च्या खारकीवमधील गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू – Russia Ukraine War

| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 7:10 PM
Share

युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. यात अनेक युक्रेनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे.

Russia Ukrain War : युक्रेन-रशियाच्या युद्धातून एक मोठी बातमी समोर आली आहेत. युक्रेनमध्ये गोळीबारात (Firing) एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू (Indian Student Death in Ukraine) झाला आहे. अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of Foreign Affairs) दिली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. अनेक भारतीय अजून युद्धात युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे. युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. यात अनेक युक्रेनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकाही भारतीयच्या मृत्यूची बातमी समोर आली नव्हती. मात्र आजची ही बातमी खळबळ माजवणारी आहे.