AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नकली आयकार्डवर मोदींच्या दौऱ्यात घुसखोरी? पोलिसांनी उधळला डाव

नकली आयकार्डवर मोदींच्या दौऱ्यात घुसखोरी? पोलिसांनी उधळला डाव

| Updated on: Jan 21, 2023 | 11:40 AM
Share

केवळ 30 मिनिटं केला पाठलाग अन् घुसखोरी करणाऱ्याला इसमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबईतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. एनएसजी कंमाडोचे आयकार्ड घालून एका इसमाने ही घुसखोरी केली. एनएसजीचे नकली ओळखपत्र गळ्यात अडकवून कडक सफारी घालून या इसमाने बीकेसीमधील मोदींच्या दौऱ्यातील सभेत घुसखोरी केली. देशाचे सर्वांत शक्तीशाली पद म्हणजे पंतप्रधानांचे असते. त्यामुळे मोदी यांना कडेकोट सुरक्षा पुरविण्यात आलेली होती. तरी देखील या इसमाने घुसखोरी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मात्र, नकली आयकार्डवर मोदींच्या दौऱ्यात घुसखोरी करणाऱ्या इसमाचा डाव पोलिसांनी उधळला लावला आहे. या घुसखोरी करणाऱ्या इसमाचे नाव रामेश्वर मिश्रा असे आहे. या रामेश्वर मिश्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याला बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबई येथे राहणारा रामेश्वर मिश्रा याने सायनमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो बीकेसीच्या मैदानात मोदींच्या सभेदरम्यान व्हीआयपी गेटद्वारे शिरण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी पोलिसांना त्याचा संशय आला आणि तेव्हापासून हा तपास सुरू करण्यात आला.

Published on: Jan 21, 2023 11:36 AM