AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahayuti : जळगावात महायुतीत जुंपली, भाजप vs शिंदे गट आक्रमक; किशोर पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

Mahayuti : जळगावात महायुतीत जुंपली, भाजप vs शिंदे गट आक्रमक; किशोर पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Nov 03, 2025 | 12:05 PM
Share

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी जळगावात महायुतीतील भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये संघर्ष वाढला आहे. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर टीकेची झोड उठवत, विकास निधी मिळत नसल्याचा आरोप केला. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचा चंग बांधल्याने महायुती स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही या मताला दुजोरा दिला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी जळगाव जिल्ह्यात महायुतीत अंतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. पाटील यांनी जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, महायुतीमधील मित्रपक्षालाच आव्हान दिले आहे. किशोर पाटील यांनी आरोप केला आहे की, भाजप काही मतदारसंघांमध्ये जाऊन शिंदे गटाच्या आमदारांना कमकुवत करत आहे. त्यांनी भाजपचे गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

किशोर पाटील यांच्या मते, महायुती सरकार सत्तेत येऊन एक वर्ष झाले तरी त्यांच्या मतदारसंघात एक रुपयाचाही विकास निधी मिळालेला नाही. विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या नेत्यांनी सहकार्य केले नसल्याचे त्यांनी म्हटले. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही किशोर पाटील यांच्या मताला दुजोरा देत, सरकारकडे निधी नसल्याचे म्हटले.

Published on: Nov 03, 2025 12:05 PM