Iran Israel War : इराणचं 400 किलो युरेनियम कुठे गायब झालं? पत्ताही लागला नाही अन् अमेरिकेला सतावतेय वेगळीच भिती
अमेरिकेला इराणमधील 400 किलो युरेनियमच्या साठ्याचा पत्ताही लागलेला नाही. 400 किलो युरेनियम पासून 10 अणुबॉम्ब तयार होऊ शकतात, याची भीती अमेरिकेला वाटते. इराणकडील युरेनियम 60 टक्के शुद्ध आणि अण्वस्त्रासाठी 90 टक्के शुद्धतेची गरज आहे. अमेरिकेच्या हल्ल्याच्या आधीच इराणने युरेनियम सुरक्षित ठिकाणी ठेवलेला आहे असे अमेरिकन माध्यमांनी म्हटले आहे.
इराणमधील 400 किलो युरेनियमचा साठा गायब झाला असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या बी टू स्टिल्थ बॉम्बर्सने इराणच्या तीन अणुकेंद्रांवर हल्ला केला होता. फोर्डो, नतांज आणि इस्फाहन या अणुकेंद्रांवर अमेरिकेने हल्ले केले होते. या हल्ल्यामध्ये इराणच्या अणु संशोधन कार्यक्रमाचं मोठं नुकसान झाल्याचा दावा अमेरिकेने केलाय. यापैकीच एका केंद्रामध्ये इराणने युरेनियम ठेवलं होतं असा दावा अमेरिकेकडून करण्यात आलेला आहे. इराणकडे असलेले 400 किलो युरेनियम आता गायब झाल्याचं वृत्त आहे. 400 किलो युरेनियमपासून 10 अणुबॉम्ब तयार होऊ शकतात याची भीती अमेरिकेला आहे. इराणकडील युरेनियम हे 60 टक्के शुद्ध आहे आणि अण्वस्त्रांसाठी 90 टक्के शुद्धतेची गरज असते. अमेरिकेच्या हल्ल्याच्या आधीच इराणने युरेनियम सुरक्षित ठिकाणी ठेवलं, असा दावा अमेरिकन माध्यमांनी केलाय.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

