AB de Villiers : यंदा IPL कोण जिंकणार? एबी डिव्हिलियर्सनं थेट सांगून टाकलं अन् विराटच्या निवृत्तीवर काय म्हणाला?
दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स सध्या भारत दौऱ्यावर आहे. मुंबईत त्याने भारतीय क्रिकेटच्या अनेक पैलूंबद्दल भाष्य केले. त्याने शुभमन गिलचे कडे गेलेलं कसोटी कर्णधारपद, भारताचा इंग्लंड दौरा आणि विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि आरसीबीचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सचा मुंबईत व्हीलचेअर खेळा़डूंसोबत संवाद साधला त्यावेळी त्याने एक मोठं वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ आयपीएलमध्ये दाखल झाल्याचा आनंद आहे आणि यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएलचं विजेतेपद पटकावेल असा मोठा दावा करत एबी डिव्हिलियर्सने विश्वासही व्यक्त केला. यावेळी एबी डिव्हिलियर्सने कसोटी सामन्यातून विराट कोहलीने घेतलेल्या निवृत्तीवरही भाष्य केले आहे. ‘विराट कोहलीने नक्कीच त्याच्या मनाचे ऐकले असेल. त्याने गेल्या काही वर्षांत जगभरातील क्रिकेटसाठी खूप काही केले आहे आणि आपल्याला तो अजूनही क्रिकेटच्या मैदानावर दिसेल. कसोटी सामन्यांमध्ये त्याची उणीव जाणवेल.’, असं एबी डिव्हिलियर्सने म्हटले आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

