Special Report | आर्यन खान आणि अनन्याचं ‘गांजा’ कनेक्शन?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Oct 22, 2021 | 9:21 PM

अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी संपली आहे. ती एनसबीच्या कार्यालयातून संध्याकाळी 6.15 च्या दरम्यान बाहेर पडली. यावेळी तिच्यासोबत वडील चंकी पांडेदेखील होते. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे तसेच अन्य एका महिला अधिकाऱ्याने अनन्याची चौकशी केली आहे.

अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी संपली आहे. ती एनसबीच्या कार्यालयातून संध्याकाळी 6.15 च्या दरम्यान बाहेर पडली. यावेळी तिच्यासोबत वडील चंकी पांडेदेखील होते. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे तसेच अन्य एका महिला अधिकाऱ्याने अनन्याची चौकशी केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही चौकशी करण्यात आली असून तिला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी ड्रग्ज संदर्भात झालेल्या चॅटिंगविषयी प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती मिळतेय. क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टीत अडकलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी अनन्या पांडेचा ड्रग्जसंदर्भात चॅटिंच्या माध्यमातून संवाद झाल्याचा संशय एनसीबीला आहे. एनसीबीतर्फे अनन्याची साधारण चार तास चौकशी करण्यात आली.

Follow us

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI