AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole | महाराष्ट्राचं सरकार गुजरातसाठी तयार केलं का? नाना पटोले यांचा खोचक सवाल

Nana Patole | महाराष्ट्राचं सरकार गुजरातसाठी तयार केलं का? नाना पटोले यांचा खोचक सवाल

| Updated on: Aug 09, 2022 | 5:13 PM
Share

Nana Patole | सत्ता स्थापन होताच पहिला मंत्रीमंडळ निर्णय हा गुजरातचं भलं करणारा असल्याने हे सरकार गुजरातसाठी तयार केलंय का असा खोचक सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

Nana Patole | सत्ता स्थापन होताच पहिला मंत्रीमंडळ निर्णय (First Cabinet Decision) हा गुजरातचं भलं करणारा असल्याने हे सरकार गुजरातसाठी तयार केलंय का असा खोचक सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. या सरकारने इतर राज्याच्या हिताचे निर्णय प्राधान्याने न घेता बुलेट ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यावरुन पटोले यांनी सरकारचा समाचार घेतला. सरकार हे असंवैधानिकच आहे. त्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. राज्यात ओला दुष्काळ (Heavy Rain) पडला आहे. विदर्भासहीत मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. पण अद्यापही पंचनामे करण्यात आलेले नाहीत असा आरोप त्यांनी केला. पण बुलेट ट्रेनासाठी (Bullet Train) हे सरकार 6000 कोटी रुपये खर्च करण्यासाठी निघालेली असेल तर हे सरकार गुजरातसाठी तयार झाले आहे का? असा प्रश्न उपस्थित राहतो असे त्यांनी सांगितले. राज्यात स्थापन झालेले सरकार हे ईडीचे सरकार असल्याचा आरोप करत या सरकारने आता तरी जनतेच्या भल्यासाठी काम करावे असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

Published on: Aug 09, 2022 05:13 PM