Pankaja Munde यांचं मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य, काय म्हणाल्या?
VIDEO | मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जोर धरत असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं सोलापुरात मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं संवैधानिक दृष्ट्या योग्य नाही.'
सोलापूर, ८ सप्टेंबर २०२३ | मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी सध्या मराठ्यांकडून जोर धरत आहे. त्यादृष्टीने सरकारकडून पाऊलं उचलली जात आहे. यावर भाजप नेत्या पकंजा मुंडे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या म्हणाल्या, ‘ओबीसीतून आरक्षण देण्याची मराठा समाजाची मागणी नव्हती. त्यांची फक्त आरक्षण देण्याची प्रामाणिक मागणी होती. मराठा समाजातील जो वंचित समाज आहे त्याला आरक्षण देण्यास सर्वांची मान्यता होती. आमची भूमिका स्पष्ट असून मराठा आरक्षणाला समर्थन आहे. पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं संवैधानिक दृष्ट्या योग्य नाही. त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं योग्य नसून ठरावीक प्रवर्गाला ते देऊ शकतात. त्यामुळे त्यांना स्वच्छ आणि खरखरं आरक्षण द्यायला हवं आणि जे आरक्षण न्यायालयात टिकेल असं आरक्षण राज्य सरकारने दिले पाहिजे’ असे म्हणत स्पष्टपणे आपली भूमिका व्यक्त केली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

