Special Report | घोटाळ्यासारखे गंभीर आरोप असलेल्यांना शिंदे-फडणवीस यांच्या कॅबिनेटनमध्ये मंत्री केलं जाणार नाही

पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी 9 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. अर्थ, गृहखातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती आहे. घोटाळ्यासारखे गंभीर आरोप असलेल्यांना मंत्री केलं जाणार नाही. विधान परिषदे ऐवजी जनतेतून निवडून आलेल्यांना प्राधान्य असेल.

वनिता कांबळे

|

Aug 09, 2022 | 12:07 AM

मुंबई : मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर काही तासांवर आलाय. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन, तब्बल 38 दिवसानंतर महाराष्ट्राला नवे मंत्री मिळणार आहेत. अंतिम यादीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) 2 तास बैठकही झाली. मुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात शेवटची रणनीती ठरलीय.

पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी 9 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. अर्थ, गृहखातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती आहे. घोटाळ्यासारखे गंभीर आरोप असलेल्यांना मंत्री केलं जाणार नाही. विधान परिषदे ऐवजी जनतेतून निवडून आलेल्यांना प्राधान्य असेल.

चंद्रकांत पाटलांना फोन करण्यात आलाय, सुधीर मुनगंटीवारांनाही फोन आलाय, याधी फडणवीस सरकारमध्ये ते अर्थ मंत्री होते. गिरीश महाजनांनाही फोन आलाय. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे पाटलाचाही नंबर लागलाय. मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनाही मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन आलाय. गणेश नाईक, विजय कुमार गावीत आणि अतुल सावे मंत्रिपदाची शपथ घेतील.

गुलाबराव पाटील पुन्हा एकदा मंत्री होतील. महाविकास आघाडीत कृषी मंत्री राहिलेले दादा भूसेंना पुन्हा फोन आलाय.. संदीपान भुमरेंना फोन आलाय…संजय शिरसाट यांचीही मंत्रिपदी वर्णी लागणार आहे.
.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें