Mumbai : जॅकलिनचा सुकेश चंद्रशेखरशी काय संबंध ?

ठग सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. त्यात जॅकलीनचंही नाव समोर आल्यानं जॅकलीनच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसच्या अडचणी पुन्हा वाढताना दिसून येत आहेत. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात जॅकलीनला ईडीने पुन्हा समन्स बजावले आहे. सुकेश चंद्रशेखरमुळे जॅकलीन पुन्हा वादात सापडली आहे. सुकेश चंद्रशेखरवर मनी लाँड्रिंग आणि इतर काही गंभीर आरोप आहेत. रविवारी जॅकलीनला मुंबई विमानतळावरही अडवण्यात आलं होतं. ईडीच्या लुकआऊट नोटीसीनंतरही जॅकलीन भारताबाहेर निघाली होती. त्यावेळी तिला मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं.

8 डिसेंबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश

ईडीने जॅकलीनला आज पुन्हा समन्स बजावत 8 डिसेंबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ठग सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. त्यात जॅकलीनचंही नाव समोर आल्यानं जॅकलीनच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

ठग सुकेशबरोबरच्या फोटोचीही चर्चा

अलिकडेच जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना पहायला मिळालं. त्या फोटोतून सुकेश आणि जॅकलीनमध्ये किती जवळीकता होती हे स्पष्ट होत आहे. तर सुकेश अनेकदा जॅकलीनला भेटला होता आणि त्याने जॅकलीनला महागडे गिफ्ट दिल्याचाही आरोप आहे. सुकेशने जॅकलीनला आतापर्यंत तब्बल 10 कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्याच्या चर्चा आहेत. त्यातल्या 52 लाखांच्या घोड्याची आणि 9 लाखाच्या मांजरीची जास्त चर्चा होत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI