बस चालकाने ओव्हरटेक केला अन् बस 50 फूट खोल खड्ड्यात कोसळली!
जालना जिल्ह्यातून एक मोठी समोर आली आहे. पुसद येथून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर एक मोठा भीषण अपघात झाला आहे. एसटी महामंडळाच्या बसचा हा अपघात झालाय.
जालना, 09 ऑगस्ट 2023 | जालना जिल्ह्यातून एक मोठी समोर आली आहे. पुसद येथून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर एक मोठा भीषण अपघात झाला आहे. मंठा ते वाटररच्या दरम्यान एसटी महामंडळाच्या बसचा हा अपघात झालाय. बसमध्ये 42 प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. ही बस 50 फूट खाली खड्ड्यात कोसळली आहे. या अपघातात 22 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.विशेष म्हणजे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.मंठा शहराच्या पुढे किलडी फाटा आहे. तिथे एक ब्रिज आहे. या दरम्यान रस्त्यावर मोठा ट्रक उभा होता. या ट्रकला ओव्हरटेक करत असताना बस खाली खड्ड्यात कोसळली, अशी माहिती बसच्या कंडक्टरने दिली आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

