Jalna, Income Tax Raid, IT Raid : 32 किलो सोन्यासह 390 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, जालन्यात आयकर विभागाची कारवाई
ज्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. त्यांची नावं समोर आलेली नाही. छापेमारी करताना 100 अधिकारी होते. यावेळी रक्कम मोजण्यासाठी 14 तास लागल्याची माहिती आहे. ही मराठवाड्यातील मोठी कारवाई असल्याचं बोललं जातंय.
जालना : मराठवाड्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बतमी जालना जिल्ह्यातील आहे. आयकर विभागानं (Jalna Income Tax Raid) जालन्यातील व्यावसायिकांवर मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई जालन्यात (Jalna) स्टील व्यावसायिकावर करण्यात आली आहे. इनकम टॅक्सने छापा टाकून ही मोठी कारवाई केली आहे. या छाप्यामध्ये 58 कोटी रुपयांची रक्कम यावेळी आयकर विभागानं जप्त केली आहे. तर याचवेळी 32 किलो सोन्यासह 390 कोटी रुपयांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. असं असलं तरी ज्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांची नावं समोर आलेली नाही. यावेळी छापेमारी करताना 100 अधिकारी होते. यावेळी रक्कम मोजण्यासाठी 14 तास लागल्याची माहिती आहे. ही मराठवाड्यातील मोठी कारवाई असल्याचं बोललं जातंय.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक

