J&M Kishtwar Cloudburst : किश्तवाडमध्ये हाहाःकार, 50 जणांचा गेला जीव अन् 100 पेक्षा अधिक बेपत्ता, ढगफुटीचा धडकी भरवणारा VIDEO समोर
किश्तवारमधील नैसर्गिक आपत्तीनंतर पंतप्रधान मोदींनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीचा हाहाःकार पाहायला मिळाला. या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड भागात १४ ऑगस्ट रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ढगफुटीमुळे पूर आला. अचानक आलेल्या या पुरामुळे अनेक घरे आणि वाहने उद्ध्वस्त झाली. अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. ३०० हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. तात्पुरता पूल बांधून लोकांना वाचवले जात आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासन त्यांना मिळाले आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतरच्या हाहाःकाराचा धडकी भरवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

