Kartik Vajir Bhorya : आमचा मंत्री पत्ते खेळतो, खोट्याला खोटं म्हणा अन्… स्वातंत्र्यदिनी ‘भोऱ्या’चा कोकाटेंवर निशाणा
स्वातंत्र्य दिनी कार्तिक वजीर उर्फ भोऱ्याचे भाषण होतंय व्हायरल... एक लक्षात ठेवा तुम्हाला स्वातंत्र्य मिळाला आहे सन्मानाने जगण्यासाठी, पैशासाठी आणि सत्यपुड लाचारी करू नये. खोट्याला खोटं म्हणा आणि सन्मान जपा, असं भोऱ्याने म्हटंलय.
रेवलगावच्या जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या कार्तिक वजीर उर्फ भोऱ्याच्या भाषणाची नेहमीच चर्चा होत असते. यंदाही स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्तिक वजीर उर्फ भोऱ्याने केलेलं भाषण सध्या चर्चेचा विषय बनले आहे. आपल्या भाषणात त्याने आत्मपरीक्षण करायला लावणारे काही मुद्दे मांडले असून ज्याची सोशल मीडियावर प्रशंसा केली जात आहे. याचबरोबर भोऱ्याने मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
‘धनधांडगे लोक गोरगरिबांना लुटत आहे, राजकारणी शेतकऱ्यांना छळत आहे. आपण निवडलेला मंत्री विधानसभेमध्ये रमी खेळतो, तरी त्याला याचं काही वाटत नाही. शेतकरी इथं शेतीत लाखो रुपये टाकतात, पिक येईल का नाही हे त्यांना माहीत नसतं.आमचा मंत्री शेतकऱ्यांच्या अडचणी सोडायच्या सोडून विधानसभेमध्ये पत्ते खेळतो, किती दुर्दैव आहे आमचं.’ असं म्हणत भोऱ्याने कोकाटेंवर हल्लाबोल केलाय.
तर पुढे तो असंही म्हणाला की, स्वातंत्र्य मिळाले की सगळ्यांना वाटतं मी हे करू शकतो ते करू शकतो. जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचं काय, स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताने खूप प्रगती केली आहे. पण गरिबी आणि श्रीमंती वाढतच चालली आहे. एक श्रीमंत आणि धनदांडगा पैशाच्या जीवावर सत्तेच्या जीवावर आमची श्रद्धास्थान असणारी एका मठाच्या हत्तीणीला त्याच्या शोक पाण्यासाठी गुजरातच्या प्राणीसंग्रहालयात नेतो. लोकं शांतीच्या मार्गाने आंदोलन करतात मोर्चे काढतात, पण त्याला काही फरक पडत नाही. पैशांना तो काहीही विकत घेऊ शकतो, असं म्हणत त्याने वनतारात माधुरी हत्तीणीला नेण्यात आलं होतं त्यावरून भाष्य केलंय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

