जयंत पाटील आधी म्हणाले पहाटेचे राजकारण आणि आता म्हणतात कशी पावले उचलली

महेश पवार, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 28, 2023 | 12:53 PM

पवार साहेब काय करतात, काय भूमिका घेतात याकडे आजही काळजीने सर्व जण लक्ष देऊन असतात. देशात आणि राज्यात शरद पवार यांना महत्व आहे.

कोल्हापूर : देशाच्या राजकारणात शरद पवार ( sharad pawar ) यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी घेतलेल्या भूमिकेकडे देशाचे लक्ष असते. पवार साहेब काय करतात, काय भूमिका घेतात याकडे आजही काळजीने सर्व जण लक्ष देऊन असतात. देशात आणि राज्यात शरद पवार यांना महत्व आहे.

पवार साहेबांनी नेहमीच पुरोगामी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. सर्वाना सोबत घेऊन जाण्याची आणि सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी जपली. आम्ही राजकारण कुठल्या दिशेला नेतो. कशा पद्धतीने नेतो. बहुजन समाजाला कसे एकसंघ ठेवू शकतो याचा विचार शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्यामुळे त्या पद्धतीनेच आम्ही पावले उचलणार आहोत असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. कोल्हापूर येथे एका सभेत ते बोलत होते.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI