बिरोबाच्या खोट्या शपथा घेणाऱ्याचं वाटोळं होतं, नाव न घेता जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर हल्लाबोल

बिरोबाच्या बनात खोट्या शपथा घेणाऱ्याचं वाटोळं होतं, असा टोला जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांना लगावला आहे. पाटील आज आरेवाडी येथे बोलत होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Aug 30, 2021 | 11:55 PM

सांगली : बिरोबाच्या नावाने चांगभलं म्हणून आशीर्वाद शपथ घेतो. बिरोबाच्या बनात खोट्या शपथा घेणाऱ्याचं वाटोळं होतं, असा टोला जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांना लगावला आहे. पाटील आज आरेवाडी येथे बोलत होते. (Jayant Patil Slams Gopichand Padalkar over taking false oaths of Biroba)

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी मध्ये बिरोबाच्या मंदिर आवारात पाणी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, अनेक वर्षांपासून आम्ही बिरोबाला येतो. देवाच्या दारात आपण कार्यक्रम घेतला आहे. आर. आर. पाटील आमदार झाल्यापासून या ठिकाणी येत होतो. त्यावेळी आम्ही बैठका घेऊन अनेक कोटी मंजूर केले. तेव्हापासून मला बिरोबा पावत आहे. बिरोबाच्या बनात येऊन खोटी शपथ घेतल्यावर त्याला भोगावे लागते.

इतर बातम्या

ED Raid: शिवसेनेला टार्गेट केलं जातंय, नोटीस न येताच ईडीच्या चौकशा सुरू; भावना गवळींचा गंभीर आरोप

VIDEO: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना निर्बंधातून सूट नाही; राजेश टोपे यांचं मोठं विधान

पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो, तशी भाजपची अवस्था; नाना पटोलेंची खोचक टीका

(Jayant Patil Slams Gopichand Padalkar over taking false oaths of Biroba)

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें