‘थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडणारा राक्षस’, मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली अन् जरांगेंवर टीका
लाखो मुंबईत गेले, ते खातील काय? टॉटलेटला जातील कुठे टेन्शन होतं का? असं कालीचरण महाराज यांनी म्हटलंय. तर थडग्यावर चादर चढवणारा त्यांचा नेता हा हिंदुत्व तोडणारा राक्षस असं म्हणत नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.
स्वयंघोषित कालीचरण महाराज यांच्याकडून मराठा मोर्चाची खिल्ली उडवण्यात आली आहे. यासह कालीचरण महाराज यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. लाखो मुंबईत गेले, ते खातील काय? टॉटलेटला जातील कुठे टेन्शन होतं का? असं कालीचरण महाराज यांनी म्हटलंय. तर थडग्यावर चादर चढवणारा त्यांचा नेता हा हिंदुत्व तोडणारा राक्षस असं म्हणत नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. कालीचरण महाराज यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आक्रमक भाषेत भाष्य करत त्यांना टार्गेट केलं. कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आता एक आंदोलन सुरु झालं होतं माहिती आहे ना, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं. कशी हवा होती त्या आंदोलनाची, लाखोंच्या संख्येने लोक मुंबईत आले होते. त्यांच्या नेत्यांनी थडग्यावर चादर चढवली. यामध्ये जातीपातीच्या आरक्षणाच्या काही गोष्टी नाहीत. यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे राक्षस, अशा शब्दात कालीचरण महाराजांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

