Language Dispute : कल्याणमधील अर्णव खैरेच्या आत्महत्येचं कारण समोर, लोकलमधील भाषा वाद नाही तर…
भाषा वादातून कल्याणमधील १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. राजकीय वर्तुळात देखील यावरून एकमेकांवर टीका करत राजकारण केले जात असल्याचे राजकीय नेत्यांनी म्हटलंय.
कल्याणमधील अर्णव खैरेने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. लोकलमध्ये हिंदी-मराठीच्या मुद्द्यावरून अर्णवला मारहाण झाल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. कल्याणच्या कोलसेवाडी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र आता पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अर्णव खैरेचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
मुंबईत हिंदी-मराठी भाषेच्या वादातून एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कल्याण येथील अर्णव खैरे मंगळवारी लोकलने मुलुंडला जात असताना ही घटना घडली होती. ट्रेनमध्ये गर्दी असल्याने अर्णवने प्रवाशांना आगे सरको असे म्हटलं आणि यानंतर चौघांनी त्याला “मराठी बोलायला लाज वाटते का?” असे म्हणत मारहाण केली. याच प्रकरणात अपडेट समोर आली आहे.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

