Kalyan : माझ्या छातीत लाथा मारल्या, केस धरून फरपटत…. बेदम मारहाण झालेल्या तरूणीनं Tv9 ला सांगितली आपबिती
कल्याणच्या नांदिवली येथील खाजगी रुग्णालयात एका रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीवर परप्रांतीय तरुणाने बेदम मारहाण केली. घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पेशंटच्या नंबरच्या वादातून हा प्रकार घडला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
कल्याणच्या नांदिवली येथील एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या मराठी तरुणीवर बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत असल्याप्रमाणे, गोपाल झा नावाच्या व्यक्तीने रिसेप्शनिस्टला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डॉक्टरांना भेटण्यासाठी आलेल्या झा यांना तरुणीने नंबर आल्यानंतर आत येण्यास सांगितले होते. यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला. तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. घटना गंभीर असून पोलिसांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, मारहाण झालेल्या रिसेप्शनिस्ट तरुणीने टीव्ही ९ मराठीला आपबिती सांगितली. ती म्हणाली, त्या व्यक्तीने मला शिव्या दिल्या. मी फक्त त्याला बोलली की सर तुमचा नंबर यायला वेळ आहे. नंबर आला तर मी तुम्हाला आतमध्ये पाठवते. यात माझी काय चुकी आहे. असे सांगितल्यावर त्याने शिव्या दिल्या. एवढंच नाहीतर मला बेदम मारलं. माझे केस ओढून बाहेर दरवाज्यापर्यंत नेलं परत मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, पुढे ती असंही म्हणाली, त्या व्यक्तीला मी थांबायला बोलली तर त्यावर त्याने अरे तूरेची भाषा केली. आईवरून शिव्या दिल्या. यात माझी चूक काय? माझी काही चूक नसताना त्याने माझ्या छातीत दोन तीन लाथा मारल्या. त्यामुळे मी खिडकीला जाऊन आपटली. एवढंच नाहीतर त्याने माझे केस सुद्धा ओढले आणि दरवाज्यापर्यंत मला घसरत नेलं आणि तिथं सुद्धा मारलं’,
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?

