Kalyan : जबर मार, पूर्ण शरीराला… मारहाण झाल्यानंतर तरूणी मानसिक तणावात, डॉक्टरांकडून हेल्थबद्दल मोठी माहिती
ज्या प्रकारे या तरूणीला त्या व्यक्तीने मारलेलं आहे. त्यावरून तो एकदम अमानुष व्यक्ती आणि तो राक्षसी प्रवृत्तीचा माणूस असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा माणसांना आपल्याला समाजामध्ये आपण कठोर शिक्षा द्यायलाच पाहिजे, असे म्हणत त्यांनी सरकारकडे त्या आरोपीच्या शिक्षेची मागणीही केली आहे.
कल्याण पूर्व येथे एका तरुणीला जबर मारहाण झाल्याची घटना काल घडली. यानंतर तिला कल्याण पूर्वेतील जानकी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. सध्या तिची प्रकृती कशी आहे? यासंदर्भात जानकी रुग्णालयाचे डॉक्टर जितेंद्र गुप्ता यांनी सविस्तर माहिती दिली आहे. जितेंद्र गुप्ता म्हणाले, मारहाण झालेली तरूणी काल आपल्याकडे उपचारासाठी दाखल झाली होती. तिच्यावर उपचार सुरू आहे. सध्या असं दिसंतय की तिला भरपूर मार लागला होता आणि त्याला नेकमध्ये स्पॅझम बसलेला आहे. पोटात आणि छातीत मार लागला आहे. तिच्या हातालाही फ्रॅक्चर झालंय. त्यामुळे ऑर्थोपेडिककडून तिच्यावर उपचार सुरू केले आहेत. कालपेक्षा आज तिची परिस्थिती थोडी सुधारलेली दिसत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

