Kangna Ranaut | 20 सप्टेंबरला कोर्टात उपस्थित न राहिल्यास कंगना रनौतला अटक होण्याची शक्यता

जावेद अख्तर मानहानी प्रकरणात सुनावणी दरम्यान अभिनेत्री कंगना रनौत आजही अंधेरी मेट्रोपोलिटन कोर्टात हजर झांली नाही. मात्र या प्रकरणात न्यायधीशांनी सांगितले की, पुढच्या सुनावणीला जऱ कंगना उपस्थित राहिली नाही, तर वॉरंट जारी करण्यात येणार आहे. 

जावेद अख्तर मानहानी प्रकरणात सुनावणी दरम्यान अभिनेत्री कंगना रनौत आजही अंधेरी मेट्रोपोलिटन कोर्टात हजर झांली नाही. मात्र या प्रकरणात न्यायधीशांनी सांगितले की, पुढच्या सुनावणीला जऱ कंगना उपस्थित राहिली नाही, तर वॉरंट जारी करण्यात येणार आहे. कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी कोर्टात  सांगितले की, कंगना आजारी आहे. त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट ही न्यायलयात सादर केले. ज्या डॉक्टरच मेडिकल सर्टिफिकेट आहे ते अत्यंत सन्मानित डॉक्टर आहेत. त्यांच्यावर भरवसा ठेवला पाहिजे. वकील रिजवान सिद्दीकी यांनी  कोर्टात असंही सांगितलं की, कंगना हिला कोरोनाची लक्षण आहेत. तिची प्रकृती ठीक नाही, म्हणून ती येऊ शकली नाही. आज तिला हजर न राहण्याची संधी दिली जावी, अशी मागणी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI