AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?

शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?

| Updated on: Aug 19, 2026 | 4:43 PM
Share

शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या मालकीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सलग पाच दिवस युक्तिवाद केला असून, आज त्यांच्या युक्तिवादाचा अंतिम दिवस आहे.

शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या मालकीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सलग पाच दिवस युक्तिवाद केला असून, आज त्यांच्या युक्तिवादाचा अंतिम दिवस आहे. या सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यातील फरक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला असेल, तर सर्वोच्च न्यायालय आम्हाला दिलासा देऊ शकते, असे मत सिब्बल यांनी मांडले.

सिब्बल यांनी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा होऊ शकत नाही, असा दावा केला. शिंदे मुख्यमंत्री झाले, मात्र ते कोणत्या पक्षातून मुख्यमंत्री झाले, हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. आमदारांच्या बंडखोरीपासून बहुमत चाचणीपर्यंतचा घटनाक्रमही त्यांनी न्यायालयासमोर मांडला.

दरम्यान, अंतिम युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे महत्त्वाची मागणी केली. शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवून टाकावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. आता या मागणीवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 19, 2026 04:27 PM

Follow Us