देवेंद्र फडणवीसांची तुफान फटके बाजी; म्हणाले मी पुन्हा येईन म्हटलं की…
एकीकडे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र आणि नाराजी नाट्य सुरू आहे. तर काहीच दिवसानंतर सत्ता संघर्षावर निकाल येण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : कर्नाटक निवडणुकांच्या प्रचाराचा बिगुल वाजला आहे. अनेक दिग्गज सध्या कर्नाटक दोऱ्यावर आहेत. यात काही चेहरे महाराष्ट्रातील ही आहेत. एकीकडे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र आणि नाराजी नाट्य सुरू आहे. तर काहीच दिवसानंतर सत्ता संघर्षावर निकाल येण्याची शक्यता आहे. याच्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधान आलं आहे. याच्यातच पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांचा ठरलेला मी पुन्हा येईनचा नारा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस हे बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहचले. यावेळी त्यांनी तालुक्यातील निट्टूर येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांनी मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो असं वक्तव्य केलं आहे.
Published on: May 05, 2023 09:36 AM
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
